• A
  • A
  • A
शिक्षणासाठी वडिलांनी विकली जमीन, मुलाची यूपीएससीत बाजी

सोलापूर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा वर्ग-१ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत श्रीकांत कुंडली खांडेकर (रा. बावची, ता. मंगळवेडा, सोलापूर) या तरुणाने देशात ३३वा तर राज्यात ओबीसी प्रवर्गात दुसरा क्रमांक मिळवला आहे.


हेही वाचा - बाळासाहेब विखे पाटलांची नात स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी
श्रीकांत हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील बावची गावचा रहिवासी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे बावची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण हे निंबोणी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. त्याने बारावी सायन्सचे शिक्षण सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठातून बीटेकची पदवी घेतली. पदवीनंतर त्याने यूपीएससी करण्याचा निर्णय घेऊन थेट दिल्ली गाठली आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी यश मिळविले.

श्रीकांत शेतकरी कुटुंबात जन्मला असून त्यांना एकूण ८ एकर कोरडवाहू शेत जमीन होती. तरीही श्रीकांतच्या वडिलांनी त्यातील ३ एकर जमीन विकली आणि त्याचे शिक्षण पूर्ण केले. उत्पन्नाचा एकमेव आधार असलेली शेतजमीन विकून आपल्याला वडिलांनी शिकविले याची कायम जाणीव श्रीकांतने ठेवली. दिल्लीत राहून रात्र-दिवस कष्ट केले आणि यूपीएससी सारखी अवघड परीक्षेत यश मिळविले. राज्यात ओबीसी प्रवर्गातून दुसरा येण्याचा मान श्रीकांतने मिळविला आहे.

हेही वाचा - तावडेंच्या राजीनाम्यावर विद्यार्थी संघटना ठाम, राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा
मोठ्या भावाचे यशात मोठे योगदान -

श्रीकांतचा मोठा भाऊ संतोष खांडेकर हा मार्केटिंगचे काम करतो. वडिलांनी शेत जमीन विकून शिक्षण दिले. त्यामुळेच हे यश संपादित करता आले आहे. त्यामुळेच आई-वडिलांबरोबरच मोठा भाऊ संतोष खांडेकर याचे देखील या यशामध्ये मोठे योगदान असल्याचे श्रीकांत यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.

श्रीकांतने यूपीएससीचा अभ्यास सुरू केल्यानंतर भारतीय वनसेवा वर्ग १ ही परीक्षा दिली आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वीही झाला. तो यापूर्वी भारतीय प्रशासन सेवेची (आयएएस) परीक्षा देखील उत्तीर्ण झाला आहे. २७ फेब्रुवारीला त्याची आयएएस परीक्षेची मुलाखत आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES