• A
  • A
  • A
भाजपला चपराक; शिवसेनेचे गणेश वानकर होणार महापालिका स्थायीचे सभापती

सोलापूर - मुंबई उच्च न्यायालयाने ६ मार्च रोजी होणारी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक बेकायदेशीर ठरवत पूर्व नियोजनानुसारच स्थायी समितीची निवडणूक राबवा, असे आदेश दिले आहेत. यामुळे शिवसेनेचे गणेश वानकर यांचा स्थायीच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गणेश वानकर - शिवसेना - नगरसेवक


सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी होणार होती. या निमित्ताने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला होता. या गोंधळाच्या भरात भाजपच्या उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. तर एका उमेदवाराचा अर्ज पळवून नेण्यात आला होता. यामुळे ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी भाजपने पिठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ. भारुड यांनी विभागीय आयुक्तांना सर्व माहिती दिली होती. यावर विभागीय आयुक्तांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सांगून निवडणूक रद्द करण्याचे आदेश पिठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना दिले होते. त्यानुसार डॉ. भारुड यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करत पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते.


पिठासनाने दिलेल्या अहवालानुसार मंगळवार दिनांक ६ मार्च ला स्थायी सभापती पदासाठी उमेदवारी अर्जही दाखल करण्यात येणार होते. मात्र, विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असून पूर्व नियोजनाप्रमाणेच निवडणूक प्रक्रिया घ्यावी, अशी मागणी वानकर यांनी केली होती.

भाजपला मोठी चपराक सेनेच्या वानकरांचा मार्ग मोकळा-

गणेश वानकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ६ मार्च रोजी झालेल्या सुनावणीनंतर पुढच्या तारखा दिल्या जात होत्या. यामुळे निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर १० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत शिवसेनेचे गणेश वानकर यांच्या बाजूने निकाल देऊन ६ मार्चची निवडणूक बेकायदेशीर असून पूर्व नियोजनानुसारच निवडणूक घ्यावी, असे आदेश मुंबई उच्यन्यायालाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांच्या सभापती पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, पूर्व नियोजनानुसार दाखल केलेल्या अर्जावर भाजपच्या राजश्री कणके यांच्या अर्जावर अनुमोदकची सही नसल्यामुळे कणके यांचा अर्ज छाननीत बाद होणार आहे. यामुळे शिवसेनेचे गणेश वानकरच स्थायी समितीचे सभापती होणार हे आता निश्चित झाले आहे. यामुळे भाजपला ही मोठी चपराक आहे.

दरम्यान भाजपने सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले होते. मात्र, सत्याचा वाली हा असतोच आमचा न्यायालयावर विश्वास होता आणि आमचा विजय म्हणजे सत्याचा विजय असल्याचे मत शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांनी यावेळी व्यक्त केल.

भाजपने सतेच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणुन रडीचा डाव खेळूला होता. मात्र, भाजपला हे पचले नाही. आमचा विजय हा सत्याचा विजय आहे. परिवहन पाठोपाठ स्थायी समितीही शिवसेनेकडे आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहर विकासाच्या दृष्टीने चांगले निर्णय घेणार असल्याचे विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES