• A
  • A
  • A
VIDEO: 'परिवहनमंत्री रावतेंना एसटीत बसायच्या लायकीचे ठेवणार नाही'

सिंधुदुर्ग - एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला पाठिंबा देत आमदार नितेश राणे यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर हल्लाबोल केला. परिवहन खात्यामध्ये दिवाकर रावतेंची बेबंदशाही हुकुमशाही आहे. एसटी कर्मचाऱ्यांना देण्यास पैसे नाहीत तर, भ्रष्टाचार करून कमविलेला पैसा जातो कुठे ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला. हे थांबले नाही तर दिवाकर रावते यांना एसटीमध्ये पण बसायच्या लायकीचे ठेवणार नाही, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला.

आमदारा नितेश राणे


हेही वाचा-
संपाला हिंसक वळण, एसटी बसवर अज्ञातांची दगडफेक


राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी तिकीट मशीन, डिजिटल मशीनमध्ये सर्वांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचे सांगितले. दर दोन-तीन महिन्यांनी हा तमाशा सुरू केला आहे. यापुढे महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार करत असाल तर खपवून घेणार नाही, असा त्यांनी इशारा दिला.

हेही वाचा-
एसटी संपाला हिंसक वळण, दोन ठिकाणी 'शिवशाही'वर दगडफेक

रावते यांनी कर्मचाऱ्यांची दिवाळी, चतुर्थी कशी असते हे पाहण्यासाठी एकदा एसटीतून फिरावे म्हणजे कर्मचाऱ्यांची, त्यांच्या कुटुंबियांची व्यथा समजेल, असा राणेंनी सल्ला दिला. स्वतः मंत्र्यांच्या गाडीतून फिरणाऱ्या रावते यांनी हा प्रकार वेळेत न थांबविल्यास त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.

हेही वाचा-
लालपरी दुसऱ्या दिवशीही सांगली आगारातच; प्रवाशांचे हाल कायम


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES