• A
  • A
  • A
चहा पावडर विकणाऱ्या आईच्या कष्टाचे पोरीने केले चीज, दहावीत आली पहिली

सांगली - एका चहा पावडर विकणाऱ्या महिलेच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. ९९.२० टक्के गुण मिळवत तिने घवघवीत यश संपादन केले आहे. नयन पवार यांची धाकटी मुलगी नंदिता पवार हिने हे नेत्रदीपक यश मिळवले आहे..


सांगलीच्या शंभर फुटी परिसरात नितीन पवार कुटुंब राहते. पती-पत्नी आणि तीन मुली असे पवार यांचे कुटुंब होते. मात्र १२ वर्षापूर्वी नितीन पवार यांचे आकस्मिक निधन झाले. पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आणि मुलींच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न नयन पवार यांच्यावर आली. मध्यमवर्गीय असणाऱ्या या कुटुंबाला कसलाही आधार नव्हता, होता तो नितीन पवार यांचा चहा पावडर विक्री करण्याचा व्यवसाय. मग नयन पवार यांनी घरो-घरी जाऊन चहा विक्री करण्याचा व्यवसाय आपल्या हाती घेतला. सायकलवर जाऊन चहा विक्री सुरू केली आणि आपल्या तिन्ही मुलींना शिकवले.


आज त्यांची मुलगी नंदिताने दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के इतके गुण मिळवले आहे. ती शिकत असलेल्या कै.ग.रा, पुरोहित कन्या प्रशालेत ती पहिली आली आहे. ९९.२० टक्के गुणातील तीन टक्के मार्क हे उत्कृष्ट सायकलपटू या क्रीडा प्रकरतील आहेत. नंदीतला यंदाच्या वर्षी शाळेतून अष्टपैलू हा किताब मिळाला आहे. ती क्रीडा प्रकाराबरोबरच नाटक, नृत्य या कला प्रकारात देखील तरबेज आहे. नंदिताला पुढे कॉमर्सचे शिक्षण घ्यायचे असून तिला सी.ए. बनण्याची इच्छा आहे. कितीही अडचणी आल्या तरी आपली सी.ए. बनण्याची इच्छा आपण पूर्ण करु असा पूर्ण विश्वास नंदितला वाटतो.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES