• A
  • A
  • A
माऊलींचा 'हिरा' हरपला, हृदयविकाराच्या झटक्याने अश्वाचा मृत्यू

पुणे- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सेवा बजाविणाऱ्या हिरा या अश्वाचा मृत्यू झाला आहे. रास्तेवाड्यात माऊलींची पालखी मुक्कामी असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या अश्वाचे निधन झाले. गेल्या ८ वर्षांपासून हिरा माऊलींच्या सेवेत होता.


वाचा-स्वत:च्या हाताने बनवून किन्नरांकडून पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना भोजन


शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या हा अश्व होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतल्याने वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. मृत्युमुखी पडलेल्या अश्वाचे वय १२ ते १३ वर्षांचे होते. पालखी प्रस्थान दिवशी हा अश्व श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली (बेळगांव) गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता.

वाचा-वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत, पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शनिवारी पालखीसह अश्वांनी आळंदीहून प्रस्थान केले होते. ३० किलोमीटर अंतर चालून अश्व शनिवारी रात्री पुणे येथे मुक्कामी पोहोचले आणि आज सकाळी माऊलींचा अश्व मृत्युमुखी पडल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.

वाचा-...पण वारी करणारच, पंढरपूरमधील शेतकऱ्यांचा निर्धारCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES