• A
  • A
  • A
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जादूटोणा, महिलेचा मृत्यू

पुणे - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जादूटोणा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीमध्ये आयसीयूमधील एका रुग्ण महिलेवर जादूटोणा केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्या रुग्ण महिलेचे निधन झाले आहे. दरम्यान या प्रकरणाचा रुग्णालयाशी काहीही संबंध नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


ही महिला स्वारगेट येथील एका रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र, प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. याच रुग्णालयात महिलेला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीत रुग्ण महिलेवर तंत्र-मंत्र करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला आहे. दरम्यान, या रुग्ण महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES