• A
  • A
  • A
पत्नीचा शरीरसुख देण्यास नकार, बापाचा मुलीवर बलात्कार

पुणे - पत्नीने शरीरसुख देण्यास नकार दिल्याने नराधम बापाने तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यातल्या वारजे परिसरात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


संबंधित महिला या व्यक्तीची दुसरी पत्नी असून अत्याचार झालेली मुलगी ही त्याची सावत्र मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारू पिऊन आल्यानंतर पत्नीने शरीरसुख देण्यास नकार दिला. मग रागावलेल्या या नराधमाने ३ वर्षाच्या आपल्या मुलीला आईस्क्रीम खाऊ घालण्याचे बहाण्याने बाहेर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.


रात्री उशिरा मुलीला घेऊन तो परत आला. मात्र, मुलीची अवस्था अत्यंत खराब होती, हे पाहून तिच्या आईला संशय आला. नवऱ्याला जाब विचारला असता त्याने तिला मारहाण केली. नंतर महिलेने जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात नेल्यानंतर हे काळे कृत्य समोर आले. पोलिसांनी या नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES