• A
  • A
  • A
'सेल्फी'च्या नादात बुडाली बोट; ३ ठार, बेपत्तांचा शोध सुरूच

पालघर - डहाणू येथे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डहाणू समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. यात ३ विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाल्याने डहाणूवर शोककळा पसरली आहे. समुद्रात बुडालेल्या ३२ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले असले, तरी काही जण अद्यापही बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवली जात येत असल्याने घटनास्थळी शोधकार्य सुरुच आहे.

डहाणू पारनाका येथील बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेजचे सुमारे ४० विद्यार्थी कॉलेज सुटल्यानंतर बोटीची सफर करण्यासाठी समुद्र किनारी गेले होते. किनाऱ्यापासून साधारणतः ३०० मीटर अंतरावर बोट गेली असताना सर्व मुले 'सेल्फी' घेण्यासाठी बोटीच्या एका बाजूला जमले. सदर बोट फायबरची असल्याने एका बाजूने वजन वाढल्याने कलंडली आणि काही क्षणात बोट सर्व विद्यार्थ्यांसह समुद्रात बुडाली. परंतु, ज्यांना पोहता येत होते त्यांनी कसेबसे बुडालेल्या बोटीच्या वरच्या भागाचा आधार घेत आपला जीव वाचवला. स्थानिक मच्छीमार बांधवांनी तात्काळ दुर्घटनाग्रस्त मुलांना बचावासाठी मदत केल्याने ३२ मुलांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर जान्हवी सुरती, सोनाली सुरती, संस्कृती सुरती यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मैनुद्दीन खान, महेश कुमावत, अमन हरिजन, कृष्णा दोबी, अर्फाज पठाण, हिना माह्यवांशी, सोनल तडवी, वैशाली माह्यवांशी, कीर्ती माह्यवांशी, करीना माह्यवांशी, मसुदा शेख, पल्लवी धिंडे, संस्कृती माह्यवांशी, सपना वाघ, डेझी झाईवाला, सोनी मौर्या, हेमंत सुरती, आरती सुरती, सना खान, मिसबाह मुन्शी, जान्हवी वाडिया, प्रियांका गुप्ता, सुमन जयस्वाल, तेजल माच्छी, जान्हवी सुरती, सोनल सुरती आणि उर्विल शाह आदी मुले समुद्रात बोटीने गेली होती. हेमा तांडेल आणि माच्छी (आडनाव) या दोन मुली अत्यवस्थ आहेत. त्यांच्यासह सर्व मुलांवर कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर दुपारनंतर बहुतेकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, सदर बोट ही धाकटी डहाणू येथील आंभिरे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. या बोटीच्या परवाण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत जात आहेत.

खासदार चिंतामण वनगा यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच, मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली असून, बचाव पथकासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यास सांगितले आहे. मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मागणी केली जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES