• A
  • A
  • A
नगर दुहेरी हत्याकांड : जगताप समर्थक नगरसेवकाचा पुण्याच्या 'ससून'मध्ये मृत्यू

अहमदनगर - आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घातल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले नगरसेवक कैलास गिरवले यांचा पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन गुन्हे दाखल असल्याने त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.नगरसेवक कैलास गिरवले


केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घातला होता. याप्रकरणी नगरसेवक कैलास गिरवले यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या गुन्ह्यातून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने ते नाशिक कारागृहात होते. त्यानंतर पोलिसांनी नगरच्या माळीवाडा परिसरातील गिरवले यांच्या कपिलेश्वर या फटाकेविक्रीच्या दुकानात छापा टाकला होता. त्यावेळी गिरवले यांच्या दुकानातून फटाक्यांसह अवैध मादक पदार्थ जप्त करण्यात आले होते. यासंदर्भात गिरवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर त्यांना कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करून अहमदनगरला आणण्यात आले होते. रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोठडीत असताना सकाळी गिरवले यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर सोमवारी उपचारादरम्यान गिरवले यांचे निधन झाले. यावेळी ससून रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES