• A
  • A
  • A
लुटारुंना पैसे न दिल्याने भाऊजीसमोर १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

नाशिक - दुचाकीवरून भाऊजीसमवेत जाणाऱ्या १९ वर्षीय तरुण विवाहितेवर चौघा लुटारुंनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पैसे दिले नसल्याने लुटारुंनी विवाहितेवर बलात्कार केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना जिल्ह्यातील मालेगावमध्ये घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मजीद कुरेशी इकबाल कुरेशी (२२ रा. रामजनपुरा) या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र


पीडिता ही मालेगाव शहरातील गोल्डननगर भागात राहणारी आहे. ती भाऊजीसोबत दुचाकीवर बसून शासकीय सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जात होती. खड्डाजिन भागातून जाताना ४ लुटारुंनी त्यांची दुचाकी अडविली. यावेळी २ लुटारुंनी जबरदस्तीने पीडित महिलेला दुसऱ्या दुचाकीवर बसवून नेले. तसेच दोघांनी पीडितेच्या भाऊजीला त्याच्या दुचाकीवरून रामजनपुरा भागातील बोरचा मळा येथे धाक दाखवून नेले. तिथे तोडपाणी म्हणून लुटारुंनी पीडितेच्या भाऊजीकडे २० हजार रुपयांची मागणी करत मारहाण केली. यावेळी पैसे देऊ न शकल्याने आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेवर नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला.
पीडित तरुणीने पोलिसात धाव घेत आपबीती कथन केली. या तक्रारीवरून अपहरण, मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार झाल्याचा गुन्हा मालेगाव शहर पोलिसात दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस ३ आरोपींचा शोध घेत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES