• A
  • A
  • A
नांदेड पालिका उपायुक्ताची 'अशीही बनवाबनवी'! बोगस प्रमाणपत्राद्वारे लिपीक ते उपायुक्तपदापर्यंत मजल

नांदेड - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा उपायुक्त रत्नाकर वाघ याने सरकारची ३१ वर्षे फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली. वरिष्ठ लिपिक ते उपायुक्त पदोन्नती त्याने मिळवली. पदोन्नती डावललेल्या सहायक आयुक्त प्रकाश येवले यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. आर्थिक लाभ तसेच अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाने आदेश दिले. त्यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात आज वाघमारेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

उपायुक्त रत्नाकर वाघमारे


हेही वाचा-
मद्यधुंद पोलिसाची ढोलकीपटूला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल
महापालिकेतील उपायुक्त रत्नाकर कांतराव कुक्कडगावकर तथा रत्नाकर वाघमारे याने चक्क अस्तित्वात नसलेल्या अस्थिव्यंग मंडळाचे ५० टक्के अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र काढले. हे प्रमाणपत्र दाखवून त्याने तत्कालीन नगरपालिकेत ३० डिसेंबर १९८७ला वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती मिळवली. त्यानंतर १७ जुलै १९९२ला पदाचे पदनाम बदलून अव्वल कारकून असे दुरुस्ती आदेश करून घेतले. तर त्यानंतर अव्वल कारकून या पदावरून लेखापाल या पदावर पदोन्नती मिळवून घेतली. वाघमारे याच्यापेक्षा सात दिवसांनी सेवाज्येष्ठ असतानादेखील प्रकाश येवले यांना पदोन्नतीपासून डावलण्यात आले. तर सेवा ज्येष्ठता नसतानाही १७ फेब्रुवारी २००६ला उपायुक्त पदाचे आदेश निर्गमित करून तेव्हापासून तो आजपर्यंत उपायुक्त म्हणून कार्यरत होता.


हेही वाचा- विशेष पथकाच्या कारवाईत अकोल्यात लाखोंचा गुटखा जप्त
रत्नाकर वाघमारे हा जन्मतः अपंग नसताना त्याने स्वतः चा अपघात झाल्याचे दर्शवून १६ सप्टेंबर १९८७ला ५० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळविले. अपंगासाठीचे आरक्षण फक्त सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी लागू आहे. तरीही वाघमारे याने तत्कालीन नांदेड नगरपालिकेची फसवणूक करून पदोन्नती मिळवून घेतली. बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करून त्याने मागील ३१ वर्षांपासून महापालिकेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. या पदोन्नतीचा १९८७ पासून आर्थिक लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार सहायक आयुक्त येवले यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने या तक्रारीची सुनावणी आज केली. या प्रकरणात वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वजिराबाद पोलीस ठाण्याला दिले आहेत. या आदेशावरून वजिराबाद पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- 'जेवढे कडक कायदे, तेवढे पोलिसांचे हप्ते जास्त'

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES