• A
  • A
  • A
केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या विरोधात सेना उमेदवार देणार?

नागपूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नागपुरात आपली हजेरी लावली. भंडारा-गोंदियात होणाऱ्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यास ते येथे आले होते. या पार्श्वभूमीवरच नागपुरातील राजकीय चित्र पलटणार असे या नागपूर भेटीतून स्पष्ट होताना दिसत आहे.

हेही वाचा
भंडारा-गोंदियात शिवसेना भाजपला पाठिंबा देणार?

या भेटीदरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना आपली ताकद लावू शकते. याबाबत ठाकरेंनी शिवसैनिकांची मते जाणून घेतली. आगामी लोकसभा निवडणूक जर शिवसेना स्वतंत्र लढली तर काय परिणाम होतील? विधानसभा आणि लोकसभा कशी जिंकता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. यावरुन शिवसेना नागपूरात भाजप विरूद्ध उभी राहू शकते अशा संकेतांना खतपाणी मिळत आहे. म्हणजे शिवसेना चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात उतरेल हे स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा सेनेला पाठिंबा - रावसाहेब दानवे

परंतु नागपुरात शिवसेनेची पाहीजे तशी ताकद नाही, यामुळे शिवसेना लोकसभा निवडणूक जरी लढली, तरी त्याचा परिणाम भाजपवर होणार नाही. पण स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेने दंड थोपाटले आहे याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे पण नाही.

हेही वाचा
'स्वप्न पहाण्यात काही गैर नाही' - खासदार विनायक राऊत

शिवसैनिकांनी नागपूरात आणखी एका जिल्हा प्रमुखाची ठाकरेंना केली मागणी :


काही महिन्यांपूर्वी झालेल्या नागपूर महानगरपालीका निवडणुकीत सेनेला सपाटून मार बसला. यावेळी नागपुरातून सेनेचे फक्त तीन नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर सेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर सतीश हरडे यांच्या जागेवर माजी खासदार प्रकाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. आता नागपूर लोकसभा मतदारसंघात आणखी एक जिल्हा प्रमुख असावा, अशी मागणी माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी बैठकी दरम्यान केली. विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वतंत्र लढण्यासाठी पक्ष बळकट करा, असाच संदेश उद्धव ठाकरे यांच्याकडून दिला जातोय.

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शिवसैनीकाचा गोंधळ :

नागपुरातील कार्यकर्त्यांशी प्रथमच उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. या बैठकीला विदर्भातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांचे नाव बैठकीतून वगळल्यामुळे त्यांनी रविभवना बाहेर गोंधळ घातला. त्यात एका कार्यकर्त्याचे म्हणने होते की, त्याने शिवसेनेसाठी स्वतःवर केसेस ओढवून घेतले असतांनाही त्याचे नाव बैठकीतून वगळण्यात आले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची समजुत काढून गोंधळ शांत करण्यात आला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES