• A
  • A
  • A
चहावाला सॉफ्टवेअर इंजिनीअर..१५ लाखांची नोकरी सोडून विकतोय चहा

नागपूर - ही कहाणी आहे एका असाधारण धाडसाची. या कहाणीचा नायक आहे नितीन बियाणी. नितीन हा तरुण मुळचा नागपूरचा. बीई, एमटेक शिकल्यानंतर त्याने पुण्यात १० वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी केली. मात्र, व्यवसाय करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग वार्षिक १५ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली आणि नागपुरात चहा विकायला सुरुवात केली. चार महिन्यापूर्वी नागपुरातील सीए रोडवर नितीन बियाणीच्या ‘चाय विला’चा प्रवास सुरू झाला.

टपरीवरच्या चहाला त्यांनी हायटेक स्वरुप दिले. अगदी चहाची ऑनलाईन मार्केटिंग करण्यापासून ते परिसरातील रुग्णालय, कार्यालय आणि व्यावसायिकांना तो चहाची थेट ऑफीस डिलेव्हरी देतो. तब्बल २० प्रकारचा चहा नितीन यांच्या चाय विलामध्ये तयार होतो. उन्हाळ्यात खास ‘आईस टी’ला ग्राहकांची पहिली पसंती असते. गेल्या महिनाभरात ५ लाखांचा चहा पिऊन दर्दी नागपूरकरांनीही या धाडसी तरुणाच्या अनोख्या प्रयोगाला भरभरुन दाद दिली.नागपुरात हंगाम कुठलाही असो, लोक चहावर ताव मारायला विसरत नाही. उन्हाळ्यात चक्क ४५ अंश सेल्सिअस तापमानातंही नागपुरकर चहा पितात. फुटपाथवरील चहाच्या टपरीवालाही रोज हजार–पाचशेचा व्यवसाय करतो. नागपुरातल्या रस्त्यांवरील टपरीवर विकणारा चहा आणि त्याच्या अर्थशास्त्राचा नितीन बियाणी यांनी अभ्यास करुन टपरीवरच्या चहाला हायटेक रुप देण्याचे प्रयत्न सुरू केले. आरामदायी वातावरणात कुणालाही चहा पिता यावा, गप्पा मारता याव्यात, अशा चाय विलाची त्यांनी ४ महिन्यांपूर्वी सुरुवात केली.महिला टपरीवर चहा प्यायला कचरतात. मात्र नितीनच्या चाय विलात जास्तीत जास्त महिला आणि विद्यार्थी येतात. त्यांची चहाची एक रेसीपी ठरलीय. नितीन हा चहासाठी मिनरल वॉटरचा वापर करतो. त्यासोबतच प्रियम चहापत्ती आणि हायजनीक पद्धतीच्या चहावर त्याचा जास्त भर असतो. २० प्रकारच्या वेगवेगळ्या चहाची चव येथे चाखायला मिळते. ८ रुपयांपासून ते २० रुपये प्रति कप या दराने तो चहाची विक्री करतो. नागपुरात कुठेही मातीच्या कुल्हडमध्ये चहा मिळत नाही. मात्र ‘चाय विला’त मातीच्या कुल्हडमध्ये चहा दिला जातो. परिसरातील शाळा, कार्यालये, व्यावसायिक आणि मोठ्या कार्यक्रमात तो चहाची थेट डिलीव्हरी देतो. ऑनलाईन चहाचे ऑर्डर घेवून तिथेही तो गरमागरम चहा पाठवतो.

नितीन बियाणी भरगच्च पगाराची नोकरी सोडली. त्यांच्या या निर्णयात पत्नीचीही सावलीसारखी साथ आहे. पत्नी पुजा बियाणी या सुद्धा पुण्यातील एका नामांकित कंपनीत इंजिनिअर होत्या. पतिची व्यवसाय करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सुद्धा वार्षिक १२ लाखांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि नागपुरात आल्या.

‘चाय विला’च्या माध्यमातून येत्या काळात नागपुरातील इतर परिसरातंही चहा विक्री सुरू करण्याचा नितीनचा माणस आहे. त्यामुळे नुकताच सुरू झालेल्या स्वॉफ्टवेअर इंजिनिअरचा चहाचा प्रवास आणखी यशाचे शिखर गाठण्यासाठी सज्ज आहे. घरचा पारंपरिक व्यवसाय किंवा शेती सोडून नोकरीच्या मागे लागणारे अनेक तरुण आहेत. वेळप्रसंगी घरची शेतीवाडी किंवा घर विकून नोकरीसाठी डोनेशन भरणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. या सर्व तरुणांनी एकदातरी नितीन बियाणी सारख्या तरुणाची भेट नक्की घ्यायला हवी.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES