• A
  • A
  • A
विद्यार्थ्यांनी भरलेली लिफ्ट चौथ्या मजल्याहून कोसळली; मोठा अनर्थ टळला

ठाणे - अंबरनाथ येथील पालिकेच्या शाळेत आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी भरलेल्या लिफ्टचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट अतिशय वेगात तळमजल्यावर येऊन आदळली.


ही बातमी देखील वाचा - तिसऱ्या मजल्यावरील लिफ्टसाठीच्या मोकळ्या जागेत पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू


अंबरनाथ पालिकेच्या मुख्यालयासमोर असलेल्या जॉय हब या इमातातीत हा प्रकार घडला आहे. सायंकाळच्या सुमारास १० ते १२ विद्यार्थी हे या इमारातीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या क्लासला आले होते. मात्र, लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचताच तिचे नियंत्रण सुटले आणि ती चौथ्या मजल्यावरून वेगात तळमजल्यावर येऊन आदळली. हा वेग इतका प्रचंड होता की, लिफ्ट जमिनीपासून ३ फूट खाली गेली. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. लिफ्टमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय किरकोळ दुखापत झाली. या लिफ्टमध्ये अडकलेल्या १० ते १२ विद्यार्थ्यांना लिफ्टचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले.

ही बातमी देखील वाचा - इमारतीचे छत कोसळले; धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दरम्यान, हा प्रकार दुसऱ्यांदा येथे घडला असला तरी या इमारतीचा मालक बांधकाम व्यावसायिक मात्र, याकडे दुर्लक्ष करतो आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES