• A
  • A
  • A
लाचखोर घरतला अतिरिक्तचा पदभार देण्यामागे 'या' राज्यमंत्र्यांचा हात

ठाणे - ‘ना खाऊगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी केली होती. मात्र, याच घोषणेला महाराष्ट्रातील एका राज्यमंत्र्यांने हरताळ फसला आहे. लाचखोरीत अडकलेल्या संजय घरत याला अतिरिक्त आयुक्त पदावर बसविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस केल्याचे पत्रच ‘ईनाडु इंडिया मराठी’ च्या हाती लागले आहे. त्यामुळे भाजपच अशा लाचखोरांना पाठबळ देत होते का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


ही बातमी देखील वाचा - अतिरिक्त आयुक्तांना ८ लाखांची लाच घेताना अटक; ४२ लाखांची होती मागणी
लाचखोर संजय घरात १९९५ साली पालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झाला होता. तब्बल २२ वर्ष पालिकेच्या विविध विभागात कार्यरत असताना सतत वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे. याच दरम्यान घरत हा २०१५ साली पालिकेचा उपायुक्त असताना त्याची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नेमणुकीचा विषयही वादग्रस्त ठरल्याने अनेक तक्रारी नगरविकास विभागात करण्यात आल्या. मात्र, त्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यातच घरत याची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यासाठी डोंबिवलीचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी शिफारस केल्याची खळबळजनक घटना उघड झाल्याने भाजपचा पारदर्शकतेचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले आहे.

ही बातमी देखील वाचा - पाहा, लाचखोर संजय घरतची वादग्रस्त कारकीर्द

दरम्यान अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह २ लिपिकांना एका विकासकाकडून अनधिकृत इमारतीवर कारवाई न करण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमाराला ८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. संजय घरत यांच्यासह लिपिक ललित आमरे व भूषण पाटील यांनी तक्रारदार विकासकाकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती ३५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ८ लाख रुपये स्वीकारताना तिघांना बुधवारी घरतच्या दालनातच सापळा लावून पकडण्यात आले होते. दरम्यान लाचखोर घरत यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची चौकशी सुरू आहे. यामुळे येत्या १ ते २ दिवसात त्यांच्याकडील मालमत्तेचे घबाड उघड करणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

ही बातमी देखील वाचा - लाचखोर संजय घरतला अटक झाल्याने 'त्या'ने वाटले पेढे

याबबत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

ही बातमी देखील वाचा - दलितांना डुक्कराची उपमा देणाऱ्या आमदार चव्हाण विरोधात संतापाची लाटCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES