• A
  • A
  • A
शिवसेनेत महिला नगरसेविका अपमानित; मनिषा तारेंचा राजीनामा

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या सभेत शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविकेकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत नगरसेविका मनिषा साईनाथ तारे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. त्या कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक १९ च्या नगरसेविका आहेत.शिवसेनेच्या मनिषा तारे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

कल्याण डोंबिवली पालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविकेकडून आपल्याला अर्वाच्च भाषेत आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तारे यांनी आपल्या राजीनामापत्रात केला आहे. तसेच आपल्यासारख्या अनेक नव्याने निवडून आलेल्या नगरसेविकांना या ज्येष्ठ नगरसेविकेकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे. या वागणुकीविरोधात आपण आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे तारे यांनी म्हटले आहे. मात्र ही ज्येष्ठ नगरसेविका नेमकी कोण याचा राजीनामापत्रात नामोल्लेख करण्यात आलेला नाही. मनिषा तारे यांनी महापौर, सभागृह नेते आणि गटनेते यांना हे पत्र पाठवले आहे. यासंदर्भात तारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अद्याप तो होऊ शकलेला नाही. विशेष बाब म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला राजीनामा द्यायचा झाल्यास त्याने महापालिका आयुक्तांकडे तो सोपवणे आवश्यक आहे. मात्र मनिषा तारे यांनी आयुक्तांऐवजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा दिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण होत आहे.

दरम्यान नवनिर्वाचित महापौर वनिता राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यावेळी पालकमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे आले होते. यांना सभागृहात घडलेल्या दोन महिला नगरसेवकांमध्ये वादावादी प्रकरणाबद्दल विचारले असता शिवसेनेत जातीभेद नसतो, महिला खुला वर्गाचे आरक्षण असल्याने त्यांना हे पद मिळाले. अंतर्गत कोणताही वाद नाही. असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES