• A
  • A
  • A
CSMT bridge collapse : दुर्घटनेला कोण जबाबदार संध्याकाळपर्यंत ठरवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई - सीएसएमटी येथील हिमालया पादचारी पूल दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या अपघातासाठी जे कोणी दोषी आहेत ते संध्याकाळपर्यंत निश्चित करा, असे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.


ऑडिटमध्ये या पुलाला सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र देणे धक्कादायक आहे. याचाही तपास करण्यात येईल. पोलिसांनी सध्या एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी आणखी जे दोषी असतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा - पालिका आणि रेल्वे प्रशासनाचे एकमेकांकडे बोट; पुलाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न
जीटी रुग्णालयात त्यांनी जखमींची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी न बोलताच मुख्यंमत्री निघून गेले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनी तत्काळ बैठक बोलावली. या बैठकीला चीफ इंजिनियर संजय दराडे, मनपा ए विभागाचे वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर उपस्थितीत होते. यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाला २४ तासात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

वाचा- CSMT पुल दुर्घटना : पुलांचे ऑडिट करताना IIT- मुंबई, बीएमसी आणि रेल्वेचा हलगर्जीपणा
ऑडिट योग्य झाले होते, दुरुस्ती सुचवली होती ती करण्यात आली होती का जर झाली नसेल तर का झाली नाही या सर्व बाबी अहवालात असल्या पाहिजेत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

गुरुवारी सायंकाळी सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले.




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES