• A
  • A
  • A
राज ठाकरेंना धक्का : मनसेचा आणखी एक मोठा मासा शिवसेनेच्या गळाला?

मुंबई - एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे इंजिनाला गती देण्यासाठी दौरे करत असताना दुसरीकडे मात्र त्यांचे खंदे समर्थक शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शिशिर शिंदे


हेही वाचा - ठामपाच्या तिजोरीवर शिवसेनेचा ताबा, स्थायी समिती सभापतीपदी राम रेपाळे बिनविरोध


याबाबत ईनाडूशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे मान्य केले. 'शनिवारी एका विवाह सोहळ्यात माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. मी शिवसेनेत काम केले आहे. त्यामुळे स्वाभाविकच भेटल्यावर बोलणे होणार' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिवसेनेतील प्रवेशाबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले.

मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान शिशिर शिंदे यांना दूर ठेवल्यामुळे ते नाराज झाले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना आपल्याला मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे पत्र लिहिले होते. तसेच ते मनसेच्या कार्यक्रमांना आणि बैठकांनादेखील येत नव्हते.


शिशिर शिंदे यांच्याविषयी थोडक्यात माहिती -

शिशिर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे १३ आमदार निवडून आले होते, त्यामध्ये भांडुपमधून शिशिर शिंदे विजयी झाले होते. अत्यंत धडाडीचे नेते म्हणून ते कायमच परिचित राहिले आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES