• A
  • A
  • A
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची लवकरच निवड, 'ही' आहेत चर्चेतील नावे

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना राष्ट्रवादीने पक्षात मोठा फेर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड केली जाणार असून पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहेत.


येत्या २९ एप्रिलला पुण्यात होणाऱ्या बैठकीत या नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पक्षाने लागोपाठ दोनदा संधी दिली आहे. तसेच तटकरे आगामी लोकसभा रायगड मतदार संघातून लढवतील, असे चिन्ह असून या तयारीसाठी त्यांना वेळ देण्याचा विचार पक्षाने केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये युती होणार असल्याने त्याची पुढील चर्चा नव्या प्रदेशाध्यक्षांसोबत काँग्रेसला करावी लागणार आहे. जयंत पाटील अनुभवी नेते मानले जातात. अर्थमंत्री म्हणून त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. सहकाराच्या राजकारणात ही पाटील सक्षम आहेत. तर राज्यात माथाडी कामगारांचे दमदार नेतृत्व शशिकांत शिंदे करत आहेत. लाखो माथाडी अन्य कामगारांमध्ये शिंदे यांचा जनसंपर्क चांगला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून गेली पंचवीस वर्षे शिंदे लोकप्रतिनिधी आहेत. सध्या कोरेगाव मतदार संघाचे आमदार आहेत.

पुण्यात होणाऱ्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार असल्याचे ही सूत्रांनी सांगितले. दरम्यान पक्षाने सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनात ही या दोन्ही नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. येत्या ६ मे पासून राष्ट्रवादीचा कोकणात हल्लाबोल मोर्चा सुरू होणार आहे. या हल्लाबोल मोर्चाचे नेतृत्व नव्या प्रदेशाध्यक्षांकडे असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES