• A
  • A
  • A
पूनम महाजन यांच्यावर 'माओवादी' विधानावरुन शिवसेनेची खोचक टीका

मुंबई - 'रामाची निंदा करणाऱ्या, 'हिंदुस्थानी' सैन्यावर चिखल फेकणाऱ्या नरेश अग्रवालांना जो पक्ष पायघड्या घालतो त्या पक्षाला शेतकऱ्यांना ‘माओवादी’ वगैरे म्हणून हिणवणे शोभत नाही, अशा शब्दात शिवसेनेने मुखपत्र सामनातून भाजप खासदार पूनम महाजनांवर हल्ला चढवण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र


शेतकऱ्यांच्या मोर्चात शहरी माओवाद घुसला असेल तर भाजप मुख्यमंत्र्यांनी अतिरेक्यांच्या मागण्या मान्य केल्या, असे मानायचे काय ? असा सवालही शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय. खा. पूनम महाजन यांचा उल्लेख करुन 'प्रमोद’ कन्येचे ‘माओ.. माओ… असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. मुंबईत धडक मारण्यासाठी आलेल्या शेतकरी मोर्चात शहरी माओवाद डोकावत असल्याचे विधान खासदार पूनम महाजन यांनी केले होते. त्याअनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे.


पूनम महाजन या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्याही राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. आपल्या मागण्यांसाठी २०० किलो मीटरची पायपीट करीत हा शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला. मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध होता व इतक्या मोठ्या संख्येने शहरात येऊनही मुंबईकरांना अजिबात त्रास झाला नाही. त्यांच्या या शिस्तीचे तोंडभर कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून टाळ्याही मिळवल्या. म्हणजे ‘माओ’वादास पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांनी अपराध केला, असे पूनम महाजन यांना म्हणायचे आहे, असेही या अग्रलेखात पुढे म्हटले आहे.

शहरी माओवादाचा विचार महाजन यांनी मांडला. पण सोमवारच्या शेतकरी मोर्चाने कोणतीही देशद्रोही घोषणा केल्याची नोंद नाही. अशी टिप्पणीही या लेखात करण्यात आली नाही.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES