• A
  • A
  • A
'देशात न्यायाधीशच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय ?'

मुंबई - आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशुतोष गुप्ता यांनी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला ब्रिगेडीयर सुधीर सावंत आणि प्रीती शर्मा-मेनन देखील उपस्थित होत्या.


या देशात न्यायाधीशच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय ? देशात कोण सुरक्षित आहे, असे यावेळी आम आदमी पक्षाचे खासदास संजय सिंग म्हणाले. न्याय दानाचे पवित्र काम करणाऱ्या न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूनंतर देशातील न्यायाधीश देखील सर्वसामान्यांप्रमाणे असुरक्षित आहेत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप सरकारच्या कार्यकाळात लोया यांना लाच देण्याचा प्रयत्न केला गेला. लोयांच्या मृत्यू नंतर कुटुंबाच्या परवानगीशिवाय त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. न्यायमूर्ती लोया यांचा खून षडयंत्र रचून करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.


भाजपचा स्टार्टप इंडियाचा प्रयोग संपूर्ण फेल आहे. हे सरकार गरिबांचे सरकार नाही तर अदानी-अंबानी यांचे सरकार आहे. आपला देश शेतीप्रधान आहे, पण देशातल्या शेतकऱ्याला मात्र कर्जमाफीच्या नावावर सरकार गाजर दाखवत असल्याची टीका यावेळी खासदास संजय सिंग यांनी सरकारवर केली.

दिल्लीमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारचे प्रशासकीय काम अत्यंत उल्लेखनीय आहे. असे काम इतर कोणत्याही राज्यात कोणत्याही सरकारने केलेले मी पाहिले नाही. म्हणून मी आम आदमी पक्षामध्ये काम करण्याचे ठरविले आहे. मुंबईमध्ये देखील अनेक विभागांमध्ये गोवंडीसारख्या भागात लोकांचा आम आदमी पक्षाविषयी इंटरेस्ट पाहिला तर पक्षाची लोकप्रियता सहज लक्षात येते, असे या पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी सांगितले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES