• A
  • A
  • A
वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कोणावरही संशय नाही - अनुज लोया

मुंबई - सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या मृत्यूमध्ये काहीच संशयास्पद नाही. कृपया मीडिया आणि इतर लोकांनी आमच्या कुटुंबियांना त्रास देऊ नये, असे स्पष्टीकरण त्यांचा मुलगा अनुज लोया याने दिले आहे. मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनुज लोया आणि त्याचे वकील अमित नाईक हे उपस्थित होते.

फोटो सौजन्य-एएनआय

अनुज लोया म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांमधून आम्हाला याबद्दल कळत आहे. पण, यात काहीही तथ्य नसून, आमची कुठलीही तक्रार नाही. त्यामुळे आजही विनंती आहे की, मला आणि माझ्या कुटुंबाला यात ओढू नका. ४ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी केवळ १७ वर्षाचा होतो. त्यावेळेस मी लिहिलेले पत्र हे भावनेच्या आहारी जाऊन लिहिले गेले होते. पण, याबाबत आता मला किंवा माझ्या कुटुंबाला कुठलाही संशय नसल्याचे अनुज लोयाने स्पष्ट केले आहे.न्या. बृजगोपाल लोया यांच्या मृत्यूबाबत कोणत्याच प्रकारचा वाद नाही. अनेक एनजीओ आणि वकील आमच्या कुटुंबियांना त्रास देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझे कुटुंबीय फारच त्रस्त असून, यातून सावरलेले नाही. वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कोणावरही संशय नाही. या बाबत आपली कुठलीही तक्रार नसून, वडिलांच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय किंवा आरोप नसल्याचे अनुज लोया याने स्पष्ट केले आहे.सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूवर वाद विवाद उभा राहिला होता. न्या. लोया हे प्रकरण मुंबईच्या उच्च न्यायालयात सुरू आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील लोया यांच्या शवविच्छेदनासंबंधी अहवाल मागवला आहे. त्यानंतर जोपर्यंत हे प्रकरण मुंबई उच्च न्यायलयात सुरू आहे, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करु नये, अशी मागणी बॉम्बे लायर्स असोशियन आणि अन्य याचिकाकर्त्यांनी केली आहे.

न्यायाधीश बृजगोपाल लोया हे आपले सहकारी न्यायाधीशांच्या मुलीच्या लग्न समारंभासाठी गेले होते. तेथे १ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचा कथित ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे म्हटले जाते.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES