• A
  • A
  • A
ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी मराठी चालकांची 'एस ३' कॅब सेवा सुरू

मुंबई - ओला आणि उबर या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मराठी चालकांनी एकत्र येऊन नवीन टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विडा उचलला होता. ही सेवा आता प्रत्यक्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे, या सेवेचे उद्घाटन आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील रस्त्यावर आजपासून मराठी चालकांच्या प्रयत्नातून तयार झालेली एस ३ कॅब धावणार आहे.

एस कॅब


ओला, उबर यांसारख्या कंपन्यांच्या कॅब अॅपच्या माध्यमातून वापरणाऱ्या ग्राहकांना एस ३ कॅब हा नवा पर्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे ज्या चालकांना ओला-उबरच्या फसव्या आश्वासनामुळे मोठा तोटा झाला, त्यांनी मिळून ही नवी सेवा सुरू केली आहे.


हेही वाचा - कोईम्बतूर आणि विशाखापट्टणममध्येही एका क्लिकवर उबेर देणार घरपोच खाद्यपदार्थ

अशी असेल एस ३ कॅब सेवा -

गेल्या वर्षीपासून या एस ३ कॅबच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते. यामध्ये ओला आणि उबर यांच्या सेवेमध्ये जे अडथळे आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्या दोघांच्या दृष्टीने ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यांना प्राधान्य दिले गेले आहे. विशेष म्हणजे यात केवळ मोबाईल अॅपद्वारेच नाही, तर कॉल करुनही आपण टॅक्सी बोलावू शकतो. यामुळे ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही, त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. तर दुसरीकडे ओला-उबरपेक्षा कमी भाडे या सेवेमध्ये आकारले जाईल आणि भाडे पद्धती देखील वेगळी असेल, असा दावा संस्थापकांनी केला आहे.हेही वाचा - चालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे हस्तमैथून

सुरक्षेसाठी विशेष सुविधा -

अशा सेवांमध्ये सुरक्षा महत्त्वाची असते. जो प्रवासी प्रवास करतोय त्याच्यासोबत चालकाचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळेच एकदा का प्रवास सुरू झाला, की मग चालकाच्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यामधून संपूर्ण प्रवास ऑटोमॅटिक सर्व्हरकडे रेकॉर्ड केला जाईल. त्यामुळे लगेचच मदत मिळणे शक्य होईल.

हेही वाचा - ओला-उबरकडून चालकांची फसवणूक, निषेधार्थ पुकारला बंद

या मराठी तरुणांची संकल्पना -

गेल्या एका वर्षापासून प्रफुल्ल शिंदे आणि राजेश काळदाते हे २ मराठी तरुण नवीन टॅक्सी सेवेची संकल्पना घेऊन फिरत होते. मात्र त्यांना आर्थिक साथ मिळत नव्हती. अखेर काही महिन्यांअगोदर ती साथ भारत फ्रेटने दिली. आत्ताच ८०० हून जास्त चालकांनी या कंपनीमध्ये आपली नोंदणी केली आहे. तर १० टॅक्सी युनियनने आपला पाठिंबा दर्शवून चालक देणार असल्याचे सांगितले आहे. सध्या तरी केवळ मुंबईमध्येच ही सेवा असेल. मात्र येणाऱ्या काळात इतर शहरातही ही सेवा सुरू होईल, असे या तरुणांनी सांगितले.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES