• A
  • A
  • A
प्रवाशांसाठी खुशखबर! लवकरच धावणार एसटीच्या नॉन एसी स्लिपर बस

मुंबई - राज्यात आता लवकरच एसटी महामंडळाच्या नॉन एसी स्लिपर बस धावणार आहेत. दरम्यान नॉन एसी स्लिपर बसेसची नोंदणी आणि वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाला सरकारकडून या आधीच परवानगी देण्यात आली आहे. तसेच ही परवानगी फक्त एसटी महामंडळाच्या गाड्यांना देण्यात आली असून, खासगी वाहनांना राज्यात नोंदणीची परवानगी देण्यात आलेली नसल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.


राज्यामध्ये नॉन एसी स्लिपर बसच्या नोंदणीला संमती नाही. पण एसटी महामंडळाच्या बाबत ही अट दूर केल्याचे रावते यांनी यांनी सांगितले.


रावते म्हणाले, महामंडळामार्फत लांब पल्ल्याच्या गाड्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात. लोक रात्री प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांना प्राधान्य देतात. सध्या असलेल्या बहुतांश गाड्यांमधून बसून प्रवास करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी गैरसोय होते. त्यामुळे एसटीमध्ये स्लिपर कोच गाड्या आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही वातानुकूलीत स्लिपर (एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. पण सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने आणि त्यांना किफायतशीर दरात प्रवास करता यावा, यासाठी विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रावते यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES