• A
  • A
  • A
धक्कादायक ! फॅशन डिझायनरने केला पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

मुंबई - आपल्या पोटच्या अल्पवयीन २ मुलींवर पित्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ४२ वर्षीय नराधम पित्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.


मुंबईत राहणाऱ्या पेशाने फॅशन डिझायनर असणाऱ्या या नराधम पित्याने त्याच्याच १७ आणि १३ वर्षीय मुलींवर वारंवार बलात्कार केले आहेत. ३ मुली आणि १ मुलगा असलेला हा वासनांध बाप त्याच्या अल्पवयीन मुलींना धमकावत बलात्कार करीत होता. हा नराधम गेल्या २ वर्षांपासून हे नीच कृत्य करीत होता. आपल्या पोटच्या १७ वर्षीय मोठ्या मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच तिच्या आईला वेश्या व्यवसायात ढकलून ३ वर्षाच्या लहान भावाचीही हत्या करण्याची धमकी हा नराधम सतत देत होता. आपल्या बहिणींना शिक्षणासाठी पैसे मिळणार नाहीत आणि जिवाच्या भीतीने पीडित मुलीने गेली २ वर्षे हा अत्याचार सहन केला.


हा नराधम येथेच न थांबता त्याने १३ वर्षाच्या दुसऱ्या मुलीलाही आपल्या वासनेचा शिकार केले. हे कृत्य करताना मोठ्या मुलीने विरोध केला असता, तिच्यावरही पुन्हा या नराधमाने धमकावत बलात्कार केला. बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या नाराधम बापाचा अत्याचार सहन न झाल्याने शेवटी मोठ्या पीडित मुलीने धाडस दाखवीत हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. अखेर पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवीत २ एप्रिल रोजी नराधम पित्याला अटक केली आहे. बलात्कार आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES