• A
  • A
  • A
लोकनेता पंचतत्वात विलीन, हजारो साश्रु नयनांनी पतंगराव कदम यांना अखेरचा निरोप

सांगली - काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपुत्र विश्वजित कदम यांनी वडील पतंगराव कदम यांना मुखाग्नी दिला. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने आपल्या साहेबांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.

सांगलीमध्ये लावण्यात आलेले पोस्टर


भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम (७२) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पुण्यातून विशेष हेलिकॉप्टरने पतंगराव कदम यांचे पार्थिव कडेगाव तालुक्यातील सोनसळ या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. काही वेळ त्यांच्या घरासमोर कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर अंतयात्रेला सुरुवात झाली.


प्रचंड जनसमुदाय या अंत्ययात्रेत आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी सहभागी झाला होता. सोनहिरा साखर कारखाण्याच्या परिसरात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पतंगराव कदम यांचे पार्थिव दाखल झाले. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी श्रध्दांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंत्रकांत पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे नेते मोहन प्रकाश, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सर्वच पक्षातील नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पतंगराव कदम यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी चितेला मुखाग्नी दिला. यावेळी पतंगराव कदम यांचे थोरले बंधू आमदार मोहनराव कदम, शिवाजीराव कदम व कदम कटुंबियांसह हजारोंच्या संख्येने आलेल्या जनसमुदायाने आपल्या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी अमर रहे अमर रहे, कदम साहेब अमर रहे या घोषणा देण्यात आल्या.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES