• A
  • A
  • A
लातूरच्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीत भजन-किर्तनाचा नाद; विमा रकमेसाठी शेतकरी आक्रमक

लातूर - अहमदपूर तालुक्यातील १६ गावचे शेतकरी पिक विमा रकमेपासून वंचित आहेत. विमा रकमेच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, नॅशनल इन्शुरन्स कंपनीने याकडे कानडोळा करत आहे. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी कंपनीच्या लातूर शाखेत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी भजन-किर्तन करून अनोखे आंदोलन केले.


अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१७ मध्ये पिक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळेल. या आशेने विविध बँकामध्ये विमा रक्कम अदा केली होती. मात्र, या शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड झाली नसल्याचे सांगत त्यांना विमा रकमेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. वेळोवेळी पोर्टलवरील दुरूस्ती करून घेणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने शुक्रवारी या शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणीच्या शाखेत ठिय्या दिला. एवढेच नाही तर या कंपनीच्या शोखतच भजन-किर्तनाचे कार्यक्रम घेतले.

हेही वाचा - पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
पोर्टलवर नावे नाहीत तर एकाच गावातील काही शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली कशी, असा सवालही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम यांनी उपस्थित केला. विमा वाटपातही राजकारण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. रक्कम पदरी पडत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. मात्र, गोंधळ सुरू होताच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विमा रकमेच्या मागणीचे निवदेन शाखा व्यवस्थापक विजय पस्तापूरे, सहायक प्रबधंक अनिकेत उबाळे, मनोज शिंदे यांना देण्यात आले. याच गावच्या शेतकऱ्यांना खरीप २०१७ सालचा विमा रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे विमा वाटपातही दुजाभाव केला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES