• A
  • A
  • A
झेडपी अध्यक्षपदी शिवसेनेचे खोतकर, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे टोपे

जालना- जिल्हा परिषदेत आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची युती झाली. या यशस्वी खेळीमुळे अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरूद्ध खोतकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीष टोपे यांची निवड झाली आहे.


आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा परिषदेची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पिठासिन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. कपले यांनी काम पाहिले. अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अनिरूद्ध खोतकर व भाजपकडून अवधूत खडके यांनी अर्ज भरले. यामध्ये खडके यांना २२ तर अनिरूद्ध खोतकर यांना ३३ मते पडली. अनिरूद्ध खोतकर ११ मतांनी विजयी झाले. तर उपाध्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीष टोपे व महेंद्र पवार यांनी अर्ज भरले. यामध्ये सतीष टोपे यांना ३३ मते तर शिवसेनेचे महेंद्र पवार यांना २३ मते मिळाल्याने सतिश टोपे विजयी झाले.


जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडीत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रित आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्याला शह देत त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री अनिरूद्ध खोतकर यांचे बंधू अनिरूद्ध खोतकर यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. तर माजी मंत्री राजेश टोपे यांचे चुलत बंधू सतिश टोपे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES