• A
  • A
  • A
प्रकाश आंबेडकरांनी ऐक्याचा व्हावे राजा, मी सरदार आहेच - रामदास आठवले

औरंगाबाद - समाजातील घटकांना एकत्र आणून ऐक्‍य झाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. हे ऐक्य प्रकाश आंबेडकरांशिवाय शक्य नाही. त्यामुळे मी दुय्यम स्थान स्वीकारत असून प्रकाश आंबेडकरांनी ऐक्‍याचा राजा व्हावे व मी सरदार आहेच, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. काल प्रकाश आंबेडकरांनी मी राजा तर रामदास आठवले म्हणजे कागदी वाघ, असे वक्तव्य केले होते, त्यावर रामदास आठवले यांनी अशी समोपचाराची भूमिका घेतली आहे.

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आज सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते होते. दलित समाज, कार्यकर्ते तसेच नेत्यांमध्ये ऐक्‍य होणे गरजेचे आहे. तळागाळातील ऐक्‍य होण्यासाठी गटबाजी न करता पुढे यावे लागेल. त्यासाठी फॉर्म्युला ठरवणे गरजेचे आहे. कोणासोबत जायचे हे मताधिक्‍याने ठरवले पाहिजे. माझे मंत्रिपद घालवण्यासाठी ऐक्‍याचा नारा दिला जात असेल तर तो मान्य होणार नसल्याचेही आठवले म्हणाले.


कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घटनेत दोषी असणाऱ्या व दलित मराठ्यांमध्ये फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय दलित कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन कॉम्बिंग ऑपरेशन थाबविण्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामागे मराठा व हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांना माझा विरोध नाही. बंद होणारच होता, समाज अगोदरच रस्त्यावर उतरला होता. त्यामध्ये माझा पक्ष आघाडीवर होता. त्यामुळे मोठे होण्याचा किंवा बॅकफूटवर जाण्याचा प्रश्‍नच नाही. योग्यवेळी मला फ्रंटफूटवर कसे यायचे ते माहित असल्याचा टोलाही यावेळी आठवलेंनी लगावला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES