• A
  • A
  • A
पोटगी मुलाच्या वेतनातून थेट आईच्या बँक खात्यात , जिल्हाधिकाऱयांचा निर्णय

लातूर - पतिच्या निधनानंतर महावितरणमध्ये अनुकंपा तत्वावर नौकरीत लागलेल्या मुलाच्या वेतनातून पोटगीची वाढीव रक्कम थेट आईच्या खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काल महावितरण विभागाला दिले. या आदेशामुळे उपासमारीची वेळ आलेल्या लातुरातील एका आईला जगण्याचा आधार मिळाला


हेही वाचा -दिलीप मोहिते पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
सनदी अधिकारी असताना सतत जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे आणि जनतेत मिसळणारे अधिकारी अशी ओळख असलेले जिल्हाधिकारी जी.श्रीकांत पुन्हा एकदा जनतेप्रती घेतलेल्या ठोस निर्णयामुळे चर्चेत आले. लातूर शहरातील वीर हनुमंत वाडी भागातील रहिवाशी असलेल्या श्रीमती विमालबाई शिंदे यांचे पती पुंडलिक शिंदे महावितरण मध्ये नौकरीत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा संजय शिंदे अनुकंपा तत्वावर महावितरण मध्ये नौकरीस लागला. मुलगा संजय शिंदे याने आईचा सांभाळ करायचे नाकारले. शिवाय आईच्या नावावर असलेले घर संजयने फसवणूक करून पत्नीच्या नावावर करून घेतले. ज्यामुळे विमालबाई शिंदे यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
हेही वाचा - प्रियांका चोपडाचा निकच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम, सायकलवरून गाठले घर
यावर आपणास पोटगी मिळावी अशी मागणी श्रीमती विमालबाई शिंदे यांनी २००७ मध्ये उपविभागीय अधिकारी लातूर यांना केली होती. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मुलगा संजय याने आईला दरमहा १५०० रुपये पोटगी द्यावी असे आदेश दिले होते. मात्र मुलाकडून मिळणारी पोटगी कमी असल्याची तक्रार आईने जिल्हाधिकारी, लातूर जी.श्रीकांत यांच्याकडे केली. यावर सदर आईला मुलाकडून मिळणारी पोटगी रक्कम कमी असल्याचे सांगत जिल्हाधिकारी लातूर यांनी मुलगा संजय शिंदे याने आई श्रीमती विमालबाई शिंदे यांना दरमहा ५ हजार रुपये पोटगी द्यावी असे आदेश देत सदर पोटगी ची रक्कम मुलाच्या वेतनातून कपात करून थेट आईच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी असे आदेश मुलगा संजय नौकरी करीत असलेल्या महावितरण विभागाला दिलेत.


हेही वाचा -विधानभवनात पाणी कसे साचले? नागपूर महापालिकेची चौकशी करा, शिवसेनेची मागणी
या आदेशात जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी महावितरणला संजय ची आई विमालबाई शिंदे यांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोडसह आदेश दिलेत हे विशेष. या आदेशामुळे उपासमारीची वेळ आलेली संजय शिंदेची आई श्रीमती विमालबाई शिंदे यांना जगण्यासाठी एक आधार मिळालाय .CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES