• A
  • A
  • A
देशमुख - मुंडे यांच्या मैत्रीचा वारसा पंकजा व अमित यांच्या रुपात अजरामर

लातूर - राजकारणाच्या पलीकडे जाऊन भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी आपली मैत्री अगदी शेवटपर्यंत जपली. या राजकारणापलिकडील मैत्रीचा वारसा आजही त्यांच्या पुढच्या पिढीने जपला आहे. पंकजा मुंडे व अमित देशमुख या मुंडे व देशमुख घराण्याच्या पुढच्या पिढीने हा मैत्रीचा वारसा अजरामर ठेवल्याची चर्चा आता विधानपरिषद निवडणूक निकालानंतर रंगू लागली आहे.


विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर लातूर जिल्ह्यातले राजकीय समीकरण पूर्णतः बदलले. लातूर लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायती आणि मनपा निवडणुकीत २०१४ पासून आजतागायत भाजपला मोठे यश मिळत गेले. परिणामी मागील कित्येक वर्षात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातुरमध्ये प्रथमच काँग्रेसवर सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली.
हेही वाचा
बीडमध्ये राष्ट्रवादीला 'धस'का; जिल्ह्यातील राजकारणात होणार मोठे उलटफेर?

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मताधिक्य असताना देखील या वेळच्या विधानपरिषद निवडणुकीतून माजी आमदार दिलीपराव देशमुख यांनी माघार घेतली. ही जागा प्रथमच राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. ज्यासाठी भाजपचे रमेश कराड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व विधानपरिषदेची उमेदवारी मिळवली. मात्र ऐनवेळी कराड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले व विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पराभवाचा धक्का बसला.

हेही वाचा
'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है', धसांचा मुंडेंना टोला

या निवडणुकीत १ हजार ३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्यामध्ये भाजपच्या सुरेश धस यांना ५२७ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना ४५१ मते मिळाली. २५ मते बाद ठरविण्यात आली होती. ही बाद झालेली २५ मते नेमकी कोणत्या पक्षाच्या मतदारांची हा संशोधनाचा विषय तर आहेच शिवाय या बाद मतांमुळे धनशक्तीच्या विजयाची देखील चर्चा सुरू आहे. या निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांचा बीडनंतर आता लातूरमध्ये चांगलाच दबदबा वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.

हेही वाचा
'राष्ट्रवादीला उमेदवार टिकवता आला नाही, विरोधकांनी आमच्या फायद्याचं वागावं'

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विजयासाठी परिश्रम घेतले मात्र मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने विश्वासघात केल्याचा आरोप अशोक जगदाळे यांनी केला. तर घड्याळ घातलेल्या हाताने आपल्याला निवडणुकीत मदत केली आशा प्रकारचे विधान भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी केले. या विधानानंतर लातूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरी जय पराजय बाजूला ठेवत राजकारण व निवडणुका त्या-त्या ठिकाणी ठेऊन विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी जपलेल्या मैत्रीचा वारसा आजही अमित देशमुख व पंकजा मुंडे यांच्या रुपाने पाहायला मिळत आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES