• A
  • A
  • A
शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची रक्कम, २३४ कोटींचे बुधवारपासून वाटप

लातूर- जिल्ह्यात खरीप पेरणीची लगबग असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रखडलेल्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावरच मिळणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निर्देशानुसार विमा कंपनी बुधवारपासून एकूण २३४ कोटींच्या पीक विम्याच्या रक्मेचे वाटप करणार आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर


राज्‍यातील इतर जिल्‍ह्यांना पीक विमा मिळत असताना लातूर जिल्‍ह्यातील शेतकरी त्‍यापासून वंचित होते. बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्‍याचा हप्‍ता ठराविक वेळेत भरलेला होता. तरीही विमा मिळत नसल्‍याने शेतकरी चिंतेत होते. याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्‍यांची दखल घेत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी मुंबईत नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक एस.राजगोपालन, विभागीय व्‍यवस्‍थापक सचिन महाडिक यांच्‍यासमवेत बैठक घेतली.


हेही वाचा-
पीक विमा भरण्यासाठी पेरा प्रमाणपत्र बंधनकारक नाही - जिल्हाधिकारी

यावेळी क्षेत्रीय प्रबंधकांनी लातूर जिल्‍ह्याला पीक विमा वाटप करण्‍यासाठी तांत्रि‍क अडचणी असल्‍याचे सांगितले. या अडचणी तत्‍काळ दूर करून लवकरात लवकर पीक विमा वाटप करण्‍याचे निर्देश पालकमंत्र्यांनी विमा कंपनीच्‍या क्षेत्रीय प्रबंधकांना दिले.

हेही वाचा-
खरीप हंगामाचा पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै अंतिम मुदत

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा देऊ, असे आश्‍वासन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले आहे. पहिल्‍या टप्‍यात १५० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. उर्वरीत रक्‍कमेचे दुसऱ्या टप्‍यात वाटप केले जाईल. पेरणीच्‍या कालावधीत पीक विम्‍याच्‍या रुपाने पैसा हाती येणार असल्‍यामुळे जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा-
पीक विमा योजनेसाठी बीडला प्रधानमंत्री पुरस्कारCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES