• A
  • A
  • A
'कांद्यात कांदा कुचका कांदा..पंकजा मुंडेंना बोचक्यात बांधा'

कोल्हापूर - अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. 'कांद्यात कांदा कुचका कांदा..पंकजा मुंडेना बोचक्यात बांधा' अशा निषेधाच्या घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत महिलांना अटक केली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.


अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या जी.आर. मध्ये सुधारणा करून त्याचा लाभ १ ऑक्टोबरपासून देण्यात यावा, तसे सेवा निवृत्तीची वयोमर्यादा ६५ करण्यात यावी, दरमहा १८ हजार वेतन मिळावे आणि सेवानिवृत्तीनंतर ३ हजार रुपये पेन्शन मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावीर उद्यानापासून मोर्चाला सुरवात झाली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन वाढ आणि भाऊबीज वाढ देण्याचे आश्वासन यापूर्वी शासनाने दिले आहे. मात्र अद्यापही त्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना फसविणाऱ्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


भर उन्हात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता अडविल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत महिलांना अटक केली. या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES