• A
  • A
  • A
माझ्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामाचा प्रभाव - एकनाथ खडसे

जळगाव - भोसरी एमआयडीसी जमीनप्रकरणी राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे भाजप श्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यानंतर नाराज खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. यापूर्वीच त्यांनी अजित पवारांची भेट घेतली असताना आता पुन्हा एकदा खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांसह अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

संग्रहित छायाचित्र


खडसे म्हणाले, कृषीमंत्री असताना शरद पवारांनी केलेल्या कामाबद्दल आजही आपण प्रभावित आहोत. त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या कामाचा ठसाही असल्याचे खडसे म्हणाले. आपल्याला काही दिवस बारामतीत जाऊन थांबावेसे वाटते. पवार हे आपल्याला नवीन नाहीत. मात्र, उद्याचे काहीही सांगता येणार नाही, अशी गुगली टाकत आपण सगळे काही स्वतःच्या ताकदीवर उभे केले आहे. त्यामुळे आपले काहीही झाकून राहत नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.


शेतकऱ्यांनी या सरकारच्या विश्वासावर विसंबून राहू नये

सरकार आपले असले तरी सरकारच्या कामावर आपण अजिबात समाधानी नसल्याची टीका माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. शेतीची अवस्था अतिशय खराब असून आपल्यालाही त्याचा फटका बसत आहे. ज्या वेगाने शेतीचा विकास व्हायला हवा होता, तो या सरकारकडून होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारच्या विश्वासावर विसंबून राहू नका, असे सांगत खडसेंनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

मी मंत्रीमंडळात असलो काय आणि नसलो तरी, त्यात काय वेगळे नाही. परंतु निर्णयक्षमता असलेली माणसे मंत्रीमंडळात नाहीत, असाही टोला खडसे यांनी लगावला. दरम्यान, अजित पवार हे निर्णय क्षमता असणारे नेते असल्याचीही कडी खडसे यांनी भाजप नेत्यांवर यावेळी केली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES