• A
  • A
  • A
दोन महिन्यापूर्वी पत्नीला नेले होते जम्मू काश्मीरला अन्.....

धुळे - शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील सुंदरबनी भागात धुळ्याचा जवान योगेश मुरलीधर भदाणे शहीद झाला आहे.

योगेश मुरलीधर भदाणे पत्नीसह


योगेश यांचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. त्यांना दोन बहिणी आहेत. त्यांचा एकुलता एक भाऊ शहीद झाल्याची माहिती मिळताच बहिणींच्या दु:खाचा आक्रोश अंगावर शहारे आणणारा होता. दोन महिन्यापूर्वीच योगेश आपल्या पत्नीला कर्तव्याच्या ठिकाणी म्हणजेच जम्मू काश्मीर येथे घेऊन गेले होते. योगेश यांचे मोठे मेव्हणे सुद्धा लष्करात आसाम येथे कार्यरत आहेत. विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर औरंगाबाद येथून योगेश सैन्यात भरती झाले होते.


योगेशच्या शौर्याची माहिती मिळताच संपूर्ण खलाणे गाव सुन्न झाले आहे. शहीद योगेश यांच्या आई वडिलांना याबाबत अजून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. आपल्या अतुल्य शौर्याने शहीद योगेश यांनी धुळे जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अजून किती जवानांच्या मृत्यूची सरकार वाट बघत आहे, निर्णय का घेत नाही असा सवालही खलाणे गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी केला आहे.

योगेश यांच्या अमरत्वाची पुष्टी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यांचे पार्थीव गावाकडे केव्हा आणले जाईल याबाबत अजून स्पष्टता नाही.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES