• A
  • A
  • A
बीड : भाजपचा जाहीर सभांवर भर तर, राष्ट्रवादीला अजूनही उमेदवार मिळेना

बीड - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी सायंकाळपासून लागू झाली. बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी भाजपने दीड महिन्यापूर्वीच जाहीर केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापपर्यंत आपला उमेदवार कोण? हे निश्चित केलेले नाही.


बीड जिल्ह्यात वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागलेले आहेत. दरम्यान, भाजपचा जाहीर सभांमधून प्रचारावर भर असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. राष्ट्रवादीकडून ज्या नेत्यांची नावे बीड लोकसभेच्या उमेदवारीसाठी समोर येतात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे या दोघांच्या नावाची चर्चा गत आठवड्यात होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा जिल्हा म्हणून बीड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष असणार आहे. मंत्री पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघात जाहीर सभांमधून बहीण प्रीतम मुंडे यांचा प्रचार करण्याची एकही ही संधी सोडत नाहीत.
हेही वाचा- परळी अंबाजोगाई रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी सुरू केला रस्ता रोको
शिवसेना पदाधिकारी प्रीतम मुंडेंसाठी प्रामाणिकपणे काम करणार?

शिवसेनेचे पदाधिकारी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्यासाठी किती प्रामाणिकपणे काम करतात हे आता बघावे लागेल. मागील ५ वर्षात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हेवेदावे आहेत. हे हेवेदावे पॅचअप करण्यासाठी युतीतील पहिल्या फळीतील नेते किती यशस्वी ठरतात यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. २०१४ मध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार दिला नव्हता.
हेही वाचा- आमदार पवार समर्थकांनी पंकजा मुंडेंचे भाषण रोखले; गेवराईची जागा देण्याची मागणी
बीड जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ५ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर बीड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे प्राबल्य आहे. सध्या आ. क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावलेले आहेत. एवढेच नाही तर गेवराई येथे धुळे-सोलापूर महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर क्षीरसागर हे उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर क्षीरसागर भाजपमध्ये जाणार अशीही एक चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बाळासाहेब आंबेडकर काय भूमिका घेतात यावरही बऱ्याच बाबी अवलंबून आहेत.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES