• A
  • A
  • A
औरंगाबाद दंगलीत जखमी पोलीस अधिकाऱ्याचा शुद्धीवर येताच पहिला प्रश्न..

औरंगाबाद - शहरात उसळलेल्या दंगलीत गंभीर जखमी झालेले एसीपी गोवर्धन कोळेकर यांचा अचंबित करणारा कर्तव्यदक्षपणा समोर आला आहे. दंगलीत जखमी झालेले कोळेकर हे दोन दिवस कोमात होते. मात्र त्यानंतर शुद्धीवर आल्यावर कोळेकरांनी दुसरी कुठलीही विचारपूस न करता थेट सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली दंगल शांत झाली का ? असा प्रश्न विचारला.
हेही वाचा - आरएसएस निकटवर्तीय ते वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध, राज्यपाल वजूभाई ठरणार 'किंगमेकर'

कोळेकर यांनी हा प्रश्न विचारल्यावर डॉक्टरांसह पोलीस आणि नातेवाईक सुद्धा शहारून गेले होते. विशेष म्हणजे स्वरयंत्राचे हाड घशात घुसल्यामुळे कोळेकरांना बोलता येत नव्हते. तरीही त्यांनी एका कागदावर लिहून विचारले, की दंगल शांत झाली का आणि त्यांच्यासोबत काम करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परोपकारी यांची तब्येत कशी आहे. स्वतः गंभीर जखमी असलेले कोळेकर शुद्धीवर आल्यानंतर पहिला प्रश्न हा विचारतात, यावरुन जखमी कोळेकर यांची आपल्या कामाबद्दल किती निष्ठा होती हे समोर येते.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES