• A
  • A
  • A
घरात पार्थिव अन् ती परीक्षा खोलीत, दहावीत प्रथम येत जन्मदात्याला श्रद्धांजली

अमरावती - वडिलांचे पार्थिव घरात असताना तिने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या कुटुंबीयांनीही त्यावेळी साथ दिली आणि ती परीक्षा देऊन परतल्यानंतर अंत्यसंस्कार विधी उरकला गेला. अशा परिस्थितीत परीक्षा देणाऱ्या त्या धाडसी मुलीने शाळेत प्रथम येऊन खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


जीवनात आईवाडीलांचे छत्र हे लेकरांसाठी सर्वात महत्वाचे असते. आपल्या जन्मदात्या वडिलाचे पार्थिव घरी असताना मोठ्या हिंमतीने परीक्षेला जाऊन शाळेत प्रथम क्रमांक मिळवून गायत्री निकम हिने आपल्या वडिलांना श्रद्धांजली दिली आहे. परीक्षा असल्यामुळे वडिलांचा अंत्यसंस्कार तब्बल तीन तास थांबवुन परिवाराने सुद्धा गायत्रीच्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षेला सलाम केला होता. आज संपूर्ण शाळेतून प्रथम आलेल्या गायत्रीचे कौतुक करण्यासाठी वडील जरी हजर नसले तरी या अनोख्या श्रद्धांजलीला संपूर्ण तालुक्यातून सलाम केला जात आहे.


हेही वाचा...
जबाबदार कोण? एकट्या पश्चिम महाराष्ट्रात एसटी कर्मचारी संपामुळे १५ कोटींचे नुकसान
धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली येथे राहणाऱ्या गायत्रीची ही जगावेगळी कहाणी. आपल्या मुलीला चांगले गुण मिळावे म्हणून प्रत्येक आई-वडील झटतात. सर्वसाधारण परिस्थिती असणाऱ्या प्रदीप निकम यांनासुद्धा आपल्या मुलींने खूप शिकावे मोठे व्हावे असे वाटत होते. त्यासाठी मिळेल ते काम करून प्रसंगी हाल अपेष्टा सहन करून मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होते. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करावी म्हणून गायत्री सुदधा प्रामाणिक प्रयत्न करत होती. अशातच ऐन परीक्षेच्या काळात नियतीने डाव साधला आणि वडील प्रदीप याना ब्रेन ट्युमर झाल्याचे निदर्शनास आल्याने सावंगी येथील रुग्णालयात उपचाराकरता भरती करण्यात आले.

हेही वाचा..
काँग्रेस संपली, मुखर्जींच्या संघ कार्यक्रमातील उपस्थितीवरून ओवेसींचा काँग्रेसवर हल्ला

वडील मरणासन्न अवस्थेत आणि पुढे आयुष्याची वळण वाट अशा दुहेरी चक्रात अडकलेली गायत्री मोठ्या हिमतीने अभ्यास करू लागली. ऐन इंग्रजी विषयाचा पेपर असण्याचा दिवशी पहाटे ४ वाजता प्रदीप निकम यांचा मृत्यू झाला. मुलीचा पेपर आणि घरात झालेली घटना. मात्र, मोठ्या हिमतीने संपूर्ण परिवाराने वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी गायत्रीपासून लपवून तिला परीक्षेला पाठविले. इकडे गायत्री परीक्षा देत असताना तिच्या वडिलांचे पार्थिव घरी आले. मात्र, ज्या मुलीसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्या मुलीने अंतिम दर्शन घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाही, असे कुटुंबीयांनी ठरविले. गायत्रीला अंतिम दर्शन घेता यावे म्हणून तब्बल तीन तास अंत्यसंस्कार थांबविले. गायत्री परीक्षेहून आल्यानंतर वडिलांचा अंत्यसंस्कार आटोपला गेला.

हेही वाचा...
चहा पावडर विकणाऱ्या आईच्या कष्टाचे पोरीने केले चीज, दहावीत आली पहिली
वडिलांचे छत्र हरवल्यानंतर शोकाकुल वातावरणात संपूर्ण परीक्षा दिलेली गायत्री आज जाहीर झालेल्या निकालात संपूर्ण शाळेतून प्रथम आली आहे. गायत्री हिचे कौतुक करण्यासाठी तिच्या घरी सर्व निंबोलीवासीयांची रिघ लागली असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तर दुसरीकडे वडिलांना दिलेल्या या अनोख्या श्रद्धांजलीची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES