• A
  • A
  • A
खडसेंची घरातच गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

अमरावती - वाहतूक शाखेच्या पश्चिम विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात मधुसुदन कॉलनी येथे काल सायंकाळी ही घटना उघडकीस आली. दिनेश ज्ञानेश्वर खडसे असे मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

सांकेतिक छायाचित्र

मृत्यू झालेले वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनेश ज्ञानेश्वर खडसे

वाहतूक शाखेच्या पश्चिम विभागात कार्यरत दिनेश खडसे हे आई, बहीण व भावासोबत मधुसुदन कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. अविवाहित असलेले दिनेश खडसे आज त्यांची साप्ताहिक सुटी असल्याने घरीच होते. त्यांची आई, बहीण व भाऊ गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त दर्शनाला गेले होते. या काळात दिनेश खडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दर्शनावरुन परतल्यानंतर त्यांच्या आईच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर तातडीने राजापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती मिळताच खडसे यांचे घर गाठले. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिनेश खडसे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकले नसून या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES