• A
  • A
  • A
भाजपच्या चिन्हावर लढणार आगामी निवडणूक - सदाभाऊ खोत

अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली. मात्र, त्यांनी आता आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघ कोणता असेल या प्रश्नाचा चेंडू त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला. मुख्यमंत्री ज्याठिकाणी विधानसभा किंवा लोकसभा लढवायला सांगतील तेथून मी निवडणूक लढवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामाच्या विभागीय आढाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत


हेही वाचा-
सदाभाऊ खोत यांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन


कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यात अमरावती विभागाची खरीप हंगामाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. कर्जमाफीची योजना अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नसल्याने व शेतकऱ्यांना बँका नवीन कर्ज देत नसल्याने ते संबंधित अधिकाऱ्यांवर यावेळी संतापले.

हेही वाचा-
'अमूल'ला अधिक दूध संकलनासाठी परवानगी देऊ - सदाभाऊ खोत

यावर्षी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर झाले नाहीत. तसेच बोंड अळीचे नुकसानीचे विम्याचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. या संपूर्ण घटनेला व कारवाईला आपणच जबाबदार आहात,असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

या बैठकीला विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह संपूर्ण महसूल व कृषी अधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या लेट लतीफपणामुळे सरकारची बदनामी होते, अशी त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा-
वारणातून पाणीपुरवठा प्रश्नाबाबत तोडग्यासाठी सात जणांची समिती - चंद्रकांत पाटील

सदाभाऊ खोतांची भाजप कार्यालयाला भेट

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अकोला येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार रणधीर सावरकर, भाजप जिल्हाध्यक्ष तेज पाटील थोरात, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता रमण जैन व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खोत यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.अमित कावरे यांच्याशी चर्चा केली. अजूनही शेतकऱ्यांकडे ६० टक्के तूर व हरभरा घरी पडून असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत येत्या ८ दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी सदाभाऊ खोत यांना केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES