• A
  • A
  • A
आईवरचा प्रश्न जिव्हारी, कार्यालयातच अधिकारी रडले ढसाढसा . . .

अकोला - वात्सल्याचे मूर्तीमंत प्रतिक म्हणजे आई. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, अशी आईची महती आपल्या संस्कृतीत सांगितली जाते. त्याही पुढे जाऊन फ. मु. शिंदे यांनी आई असते जन्माची शिदोरी, पुरतही नाही, अन् उरतही नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आईवर कोणी वाईट बोलले, तर अंगाचा तिळपापड होतो. असाच प्रकार अकोला महापालिकेत घडला असून, माझ्या आईने मला मोठ्या कष्टातून शिकवले आहे. माझ्या आईचे नाव काढू नका, असे म्हणत सहाय्यक आयुक्त ढसाढसा रडले. त्यामुळे त्या आईच्या कष्टाचे चिज झाले नसते, तर नवलच.


त्याचे झाले असे, की समाज कल्याण विभागातील विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ प्रकरणात अटक झालेल्या लिपिकाचा मुद्दा शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावेळी पीडितेने विनभंग करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला. त्या आरोपीला महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पाठीशी घालत असल्याचा आरोपही या महिलेने यावेळी केला.

यावेळी बोलताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी त्या महिलेला आपण कोणालाही पाठीशी घालत नसल्याचे सांगत तुम्ही मला माझ्या आईसारख्या असल्याचे स्पष्ट केले. मात्र संतप्त झालेल्या त्या पीडित महिलेने मला तुमच्या आईसारखे म्हणत आहात. जर तुमच्या आईसोबत असा प्रसंग घडला असता, तर तुम्ही आरोपीला असेच पाठीशी घातले असते का, असा प्रश्न केला. त्यामुळे हा शब्द सहाय्यक आयुक्त यावलीकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. माझ्या आईने मला मोठ्या कष्टातून शिकवले आहे. त्यामुळे त्यांचे कार्यालयीन कामकाजात नाव काढू नका, असे म्हणत यावलीकर कार्यालयातच ढसाढसा रडले. सहाय्यक आयुक्त रडत असल्याने त्या महिलेलाही त्याचे वाईट वाटले. हा प्रकार पत्रकार परिषदेदरम्यानच घडल्याने उपस्थित प्रतिनिधीही चांगलेच अचंबीत झाले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES