• A
  • A
  • A
'गोपीनाथ मुंडेंना मुलगा असता तर ....', वाचा, काय म्हणाल्या पंकजा मुंडे

अहमदनगर - "तीन मुली असल्याची खंत आपल्या वडिलांना कधीही वाटली नाही. उलट, मुलगा असता तर तो वाया गेला असता त्यामुळे आपली बदनामी झाली असती, असे त्यांना नेहमी वाटायचे", अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.


जिल्ह्यात स्वयंसहाय्यता गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना मुंडे बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

बापाला जमले नाही, ते लेकीला कसे जमणार?कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा मुंडे यांना उशीर झाला. यावर बोलताना मुंडे यांनी जे वडिलांना जमले नाही ते लेकीला कसे जमणार. रस्त्यावर भेटण्याकरता माणसे असतात त्यांना टाळता येत नाही. कार्यकर्त्यांना सत्कार टाळून पुढे जाता येत नाही असे म्हटले आहे.

जन्मदरात वाढ, मृत्यूदरात घट-

आघाडी सरकारच्या काळात शौचालयाची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर आज शौचालय बांधण्याची वेळ आली नसती. महिला आर्थिक सक्षम झाल्यास त्यांना सन्मान मिळेल. बचत गटांनी मार्केटिंगवर भर देण्याची गरज असल्याचे मुंडेंनी यावेळी सांगितले. बेटी बचाओ बेटी पढाओ सरकारने सुरू केल्यामुळे पूर्वी १००० मुलांच्या मागे ७००-८०० मुलींचे प्रमाण होते. आता त्यात वाढ झाली असून जन्मदर ९१४ वर पोहचल्याचे मुंडे म्हणाल्या.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES