• A
  • A
  • A
न्यूझीलंडमध्ये हार्दिक पंड्या झाला ट्रोल, महिलेकडून पोस्टरबाजी

ऑकलंड - न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात एका महिलेने हार्दिक पंड्याला ट्रोल केले आहे. 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाला अनुसरुन महिलेने स्टेडियममध्येच हार्दिकला आज करके आया क्या? असा उपरोधिक प्रश्न विचारणारे पोस्टर दाखवले.


हेही वाचा - WI VS ENG TEST: मार्क वूडच्या घातक गोलंदाजीने इंग्लंड आघाडीवर
आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हार्दिकला निलंबनाला सामोरे जावे लागले होते. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर संघात हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले आहे. परंतु, चाहते अजूनही पंड्याचे विधान विसरले नाहीत. पंड्याच्या या विधानावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी नाराजी दर्शवली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यातही हेच दृश्य पाहायला मिळाले. सामन्यात महिलेने याच मुद्याला हात घालताना पंड्याला आज करके आया क्या? असे पोस्टर दाखवले.

हेही वाचा - IPL 2019: शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा ब्रँड अॅम्बेसेडरपदी
कॉफी विथ करण या शोमध्ये पंड्याने महिलांबद्दल आक्षेपार्ह करताना म्हटले होते, की आम्ही घरी खुलेपणाने सेक्सबद्दल चर्चा करतो. मी पहिल्यांदा केले होते तेव्हा मी आईला, आज मै करके आया, सांगितले होते. मी आई-बाबांसोबत पार्टीला गेल्यावर आईने मला तु यामधील कोणत्या मुलीला पसंद करतो, असे विचारल्यावर मी अनेक मुलींकडे बोट दाखवले होते, असे हार्दिकने शोमध्ये म्हटले होते. यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आणि के. एल. राहुलवर कारवाई करताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून दोघांना माघारी बोलावले होते.

हेही वाचा - IPL 2019: राजस्थान रॉयल्सने 'या' कारणासाठी बदलला जर्सीचा रंग

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES