• A
  • A
  • A
भारताची विजयी मुहूर्तमेढ : इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव, कुलदीप ठरला 'हिरो'

नॉटिंघम - ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर आठ गडी राखून विजय मिळवत भारताने विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सलामी फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत भारताच्या विजयाचा एकतर्फी मार्ग मोकळा करून दिला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर २६९ धावांचे आव्हान ठेवले होते. दमदार सुरूवातीनंतरही इंग्लंडला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.


प्रत्युत्तरात भारताने ४०.१ षटकात दोन गडी गमावत विजयाचे आव्हान पूर्ण केले. सलामी फलंदाज शिखर धवनने ४० धावा केल्या तर फटकेबाज फलंदाज विराट कोहलीने ७५ धावा केल्या. लोकेश राहुल नाबाद ९ धावाची खेळी केली.हेही वाचा -
इम्रान खानला भारतीय मुले आहेत, माजी पत्नीचा गंभीर दावा
कुलदीप यादवच्या फिरकीसमोर इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे कोलमडून पडली. कुलदीपने १० षटकात २५ धावा देताना ६ बळी घेत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभी करण्यापासून रोखले. कुलदीपची ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. कुलदीपशिवाय चहलने १ तर उमेशने २ बळी मिळविले. जोस बटलर ५३ तर बेन स्टोक्सने ५० धावा करत इंग्लंडचा डाव सावरला. इंग्लंड निर्धारित ५० षटकांत २६८ धावा करू शकला. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ कौलला मात्र एकही विकेट घेता आली नाही.


हेही वाचा -विम्बल्डन २०१८ : ज्युलिया जॉर्जेस पराभूत करत सेरेना विल्यम्सची अंतिम फेरीत धडक
ही मालिका म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालिम असल्याचे मानले जात आहे. पुढील विश्वकप स्पर्धा ब्रिटनमध्ये २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे ही मालिका ‘विराट अ‍ॅन्ड कंपनी’साठी येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची उत्तम संधी आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES