• A
  • A
  • A
U-१९ विश्वचषक; भारताची विजयी सलामी, १०० धावांनी ऑस्ट्रेलियावर मात

माऊंट माऊंगानुह - अंडर-१९ विश्वचषकामध्ये आज भारतविरूद्ध ऑस्ट्रेलियामध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली. भारताने १०० धावांनी ऑस्ट्रेलियावर मात केली.

सौजन्य - आयसीसी


भारताने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कारला यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर ३२९ धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद २२८ धावांवर गारद झाला.


भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. आघाडीच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी केली. सलामीला आलेल्या जॅक एडवर्डसने अर्धशतक झळकावले. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. जॅक एडवर्डसने ७६ धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही कांगारू फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून शिवम मावीने ३, कमलेश नगरकोटीने ४, अभिषेक शर्मा आणि अनुकुल रॉयने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सावध सुरुवात करत नंतर पृथ्वी शॉ आणि नवज्योतने धावांची गती वाढवली. पृथ्वीने १०० चेडूंमध्ये ९४ धावा केल्या. तर नवज्योतने ९९ चेंडूमध्ये ८६ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर शुभम गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ७ बाद ३२८ धावांचे आव्हान ठेवले. शुभमने ५४ चेंडूमध्ये ६४ धावांची खेळी केली.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES