• A
  • A
  • A
इंटरनेटच्या व्यसनामुळे येऊ शकते नैराश्य

न्यूयॉर्क- इंटरनेटने सर्वांना झपाटून टाकले आहे. दिवसभर फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर चॅट करणे हा जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे परंतु, इंटरनेटच्या अधिक वापरामुळे नैराश्य येऊ शकते असा एक अभ्यास समोर आला आहे.इंटरनेटच्या व्यसनाच्या आहारी गेलेले लोक बहुतेक वेळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असतात. इंटरनेटच्या वापरामुळे त्यांचे शाळा, कॉलेज आणि इतर जीवन प्रभावित होते. अशा विद्यार्थ्यांना नियोजन आणि वेळेच्या व्यवस्थापनाची गंभीर समस्या असते. एखाद्या गोष्टीत अती लक्ष घालणे किंवा लक्षच न देता येणे या गोष्टी त्यांच्याकडून घडतात.इंटरनेटच्या व्यसनाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या व्यसनाचे गंभीर परिणाम मानसिक आरोग्यावर घडत असल्याचे दिसून येत आहे. असे कॅनडा विद्यापीठाच्या मायकल व्हॅन अमेरिनगेन यांनी म्हटले आहे.इंटरनेटचे व्यसन म्हणजे काय? ही व्यक्ती इंटरनेटच्या आहारी गेली आहे असे आपण नेमके केव्हा म्हणू शकतो यावर अद्याप अभ्यास चालू आहे. हा निष्कर्ष केवळ २५४ जणांचा अभ्यास करुन काढण्यात आला आहे. अचूक निदान समजण्यासाठी सॅम्पल साइज वाढवणे आवश्यक आहे असे मायकल यांनी म्हटले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES