• A
  • A
  • A
कल्याणराव सोडणार भाजपचा 'आखाडा'..? सावता परिषदेकडून मुंडें विरोधात नाराजी

बीड - सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडेंवर फेसबुकवरुन जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आखाडे यांना ओबीसी महामंडळावर घेण्याचे आश्वासन मुंडेंनी दिले होते. पण, ऐनवेळी शिवसेनेच्या नेत्याला ही संधी दिली गेली. त्यामुळे आखाडे नाराज आहेत. दोन महिन्याखाली झालेल्या सावता परिषदेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या तोंडून आखाडे यांनी ही नाराजी वदवून घेतली होती.


गेल्या १४ वर्षांपासून कल्याण आखाडे गोपीनाथ मुंडेंच्या सोबत आहेत. आखाडेंना भाजपसोबत जोडण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा हात आहे. सावता परिषदेच्या माध्यमातून आखाडेंनी जिल्ह्यात माळी समजाला संघटीत केले आहे. जिल्ह्यासह राज्यातील इतर ठिकाणीही त्यांनी सावता परिषदेचे काम वाढवले आहे. इतक्या दिवसांची भाजपची साथ सोडून आखाडे जाणार का, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील काही महामंडळांचे वाटप झाले. त्यातील ओबीसी महामंडळावर कल्याण आखाडेंना घेण्यात येईल अशी शक्यता वर्तविली जात होती. पंकजा मुंडेंनी तसे आश्वासन त्यांना दिले होते. मात्र, हा शब्द मुंडेंकडून पाळला गेला नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंविषयी सावता परिषदेच्या कार्यकर्त्यांत नाराजी वाढीस लागली आहे.

भाजपसोबत रहावे की नाही याचा निर्णय येत्या चार दिवसात आखाडे घेणार असल्याचे बोलले जात आहे. आखाडेंनी भाजपचा हात सोडणे हे मुंडेंना परवडणार नाही, असे सांगितले जात आहे. आखाडे यांच्या मागे जिल्ह्यातील माळी समाजातील मोठा घटक आहे. आखाडेंना भाजपच्या सत्तेचा काहीच फायदा झाला नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे हा कलह मिटवण्यासाठी मुंडे काय करतात, हे पाहणे महत्वाचे आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES