• A
  • A
  • A
बेरोजगार तरुणाने सुरू केला चहाचा व्यवसाय, चहाच्या गाड्याला दिले 'हे' नाव

बीड - अत्यंत गरिबी परिस्थितीत एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. नोकरीसाठी अनेक संस्थाचालकांकडे चकरा मारल्या. मात्र, आधी पैसे भरा मग नोकरी, असा निरोप संस्थाचालकांकडून यायचा. या सगळ्या बाबींना वैतागून अखेर समाजशास्त्रात एम. ए. झालेल्या तरुणाने चक्क 'पदवीधर टी हाऊस' नावाने बीडमध्ये चहाचा गाडा सुरू केला आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसेल तर हे माझे अपयश नसून, या देशातील व राज्यातील सरकारचे अपयश आहे. करण ते मला नोकरी देऊ शकले नाहीत, असे त्या तरुणाला वाटते. त्या तरुणाच्या या वाटचालीचा घेतलेला हा आढावा...

नितीन धुताडमल


नितीन माणिक धुताडमल असे त्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाचे नाव आहे. १० बाय १० च्या खोलीत अख्खे कुटुंब राहते. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने नितीनने मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने एम. ए. समाजशास्त्रपर्यंतचे शिक्षण शहरातील बलभीम महाविद्यालयातून पूर्ण केले. घरात आई वडील पत्नी व दोन मुली असे नितीनचे कुटुंब आहे.
हेही वाचा - स्थानिक राजकारणाला बगल देत मुख्यमंत्र्यांनी साधला बीडकरांशी संवाद
वडील थकल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी नितीनवर येऊन पडली. नितीनचे एम.ए.चे शिक्षण होऊनदेखील त्याला नोकरी मिळत नव्हती. बीसीएचे शिक्षणदेखील नितीनने शिक्षण पूर्ण केले. व्यावसायिक अभ्यासक्रम केल्यावर तरी आपल्याला नोकरी लागेल, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र, नोकरी मिळत नसल्याने नितीनच्या कुटुंबाचे प्रचंड हाल होऊ लागले.
दरम्यान, नोकरभरती लांबत असल्याने शासकीय नोकरी मिळाली नाही. एखाद्या शैक्षणिक संस्थेवर देखील त्याला नोकरी मिळाली नाही. आता नोकरीचे त्याचे वय निघून गेले आहे. या सगळ्या अनुभवानंतर नितीन खचून न जाता शिक्षण म्हणजे स्वावलंबनाची घोषणा करत चक्क चहाच्या गाड्याला 'पदवीधर टी' हाऊस असे नाव देऊन चहाचा व्यवसाय सुरू केला आहे.
हेही वाचा - आर या पार ... पुण्यात शिक्षक भरतीच्या मागणीसाठी भावी शिक्षकांचे बेमुदत उपोषण
नितीन चहाच्या गाड्यावर दिवसाकाठी १ हजार रुपये कमावतो. लोक देखील मोठ्या आदराने नितीनच्या गाड्यावर चहा प्यायला येतात. कोणी नितीनकडे शिक्षण होऊन देखील चहा विकतो असे म्हणून पाहतात तर काही लोक सरकारच्या नाकर्तेपणामुळे नितीनसारख्या तरुणांना नोकरी मिळत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत चहा पितात. लोक काय म्हणतात, यापेक्षा नितीनला खर्च जाऊन पाच-सहाशे रुपये राहतात. यात नितीनचे घर चालते यातच नितीन समाधानी आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES