• A
  • A
  • A
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर अनंतात विलीन, सिनेसृष्टीतील मान्यवरांनी दिला साश्रूपूर्ण नयनांनी निरोप

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिने, नाट्य सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. गेले वर्षभर रमेश भाटकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. मात्र, सोमवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


अंत्यसंस्कारावेळी त्यांच्यासोबत काम केलेले अनेक मित्र आवर्जून उपस्थित होते. सचिन पिळगावकर, विजय पाटकर, सुनील बर्वे, चंद्रकांत कुलकर्णी, विनय येडेकर, विजय केंकरे, जयंत सावरकर, गंगाराम गवाणकर, शिवाजी साटम, सतीश पुळेकर, आदेश बांदेकर, सुशांत शेलार, विजय कदम, अशोक समेळ, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, उच्च आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

हेही वाचा - अभिनय क्षेत्रातील ‘कमांडर’ हरपला - विखे पाटील
रमेश भाटकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून येत्या ११ फेब्रुवारीला यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात संध्याकाळी ६ वाजता श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES