• A
  • A
  • A
भाजपला दे धक्का; विश्वजीत कदमांच्या भात्यात शिवसेनेचा बाण

सांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा देत भाजपला झटका दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.


काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक २८ मे रोजी होणार आहे. काँग्रेसच्या वतीने पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे येथून निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वजीत कदम यांना आपला पांठिबा जाहीर केला होता. त्यानंतर आज शिवेसनेनेही विश्वजीत कदम यांना पाठिंबा जाहीर करून भाजपाला झटका दिला आहे.


हे ही वाचा -पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुखांनी असा काढला पतंगराव कदमांचा वचपा

सहकार क्षेत्रात पतंगराव कदम यांची भूमिका पक्षीय राजकारणाच्या पलीकडची होती. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन, त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही विश्वजीत कदम यांना पाठिंबा देत आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.दिवंगत नेते पतंगराव कदम यांची रिक्त झालेली पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी शिवसेनेची इच्छा होती. पण भाजपने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत.

संग्रामसिंह हे पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत बंधू आहेत. संग्रामसिंह यांच्या उमेदवारीने पृथ्वीराज समर्थकांना धक्का बसला आहे. मुळात ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपने अचानक ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता शिवसेनेने विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा देऊन भाजपला धक्का दिला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES